कार्य

1) प्रबोधनाच्या क्षेत्रात काम करणारी 'निर्मित ग्रामीण विकास प्रतिष्ठान' हि संस्था सुरु केली.

2) नेहरू युवा केंद्राने आयोजित केलेल्या अनुउर्जा चर्चासत्रात दिल्ली येथे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले.

3) झी २४ तास या वृत्तवाहिनीवरून चालणाऱ्या 'पासवर्ड आनंदाचा ' या कार्यक्रमात सहभाग.

4) सॉफ़्टस्किल डेव्हलपमेंट या विषयांवर त्यांची व्याख्याने

5) महाराष्ट्र शासनाच्या 'यशदा' या शिखर संस्थेतील प्रशासकीय अधिकाऱ्यांना मोटिव्हेशनल लेक्चर

6) व्याख्याता,एक लेखक,ग्रामीण भागातील तरुणांचं नेतृत्व करणारा एक युवा कार्यकर्ता

7) संपूर्ण स्वच्छता अभियानाची चळवळीमध्ये सहभाग

8) राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून न्यू आर्ट्स कॉलेजने एक गाव निर्मल ग्रामसाठी दत्तक घेतले.त्या गावात प्रत्यक्ष काम करण्याची संधी दडविली नाही.त्या गावाला 'निर्मल ग्राम' पुरस्कारही मिळाला.

9) जिल्हा परिषद पुणे या ठिकाणी मानव विकास संसाधन व्यक्ती 'यशदा' या शासनाच्या प्रशिक्षण संस्थेत संसाधन व्यक्ती,विविध कंपन्यामध्ये मोटिव्हेशनल लेक्चर

10) निर्मल ग्राम अभियानात २००७-०८ मध्ये केंद्रीय समितीत काम केले.

11) गावाकडे जाऊन युवकांचे संघटन केले.ग्रामपंचायतच्या निवडणुकीला उभे राहून ग्रामपंचायतची निवडणूक जिंकली.

12) शाळा,महाविद्यालये,गावोगावी फिरून त्यांनी प्रबोधनाचे काम केले.

13) ग्रामीण भागातील तरुणांनी अध्यात्माकडे वळावे यासाठी सदैव प्रयत्नशील आहे.