प्रशंसा-पत्र

श्री गणेश शिंदे हे सर्वांनाच युवा व्यख्याते म्हणून म्हणून सुपरिचित आहेत.व्याख्यानातील दमदार शैली व विषयावरील मार्मिक चिंतन हे त्यांच्या व्याख्यानातील मला महत्वाचे पैलू वाटतात.आजपर्यंत ते मला एक व्याख्याते म्हणून परिचीत होते.नुकतेच त्यांचे "सुख" हे पुस्तक वाचण्यात आले.एवढया कमी वयात सुख या विषयावर त्यांचे जे चिंतन आहे ते वाचून मी भारावून गेलो.त्यांची अशीच प्रगती व्हावी अशी माझ्या मनापासून शुभेच्छा.
— श्री सुभाष देशमुख
माजी खासदार, सोलापूर
ग्रामीण भागातून पुण्यात आलेल्या गणेश शिंदे या युवा व्याख्यात्याने आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर पुणेकरांना भुरळ घातली.आज त्यांच्या व्याख्यानाच्या ध्वनिफितींचे प्रकाशन करताना मला मनस्वी आनंद होत आहे.त्यांच्या भावी वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा !
— मा.विलास लांडे
आमदार भोसरी, पुणे