वक्ता दशसह्त्रेषु

काही दिवसांपूर्वी मी गणेश शिंदे यांचे व्याख्यान ऐकले आणि मी भारावून गेलो.बालगंधर्व रंग मंदिरला "संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज" यांच्या जीवन चरित्रावर ते बोलणार होते.या आधी मी त्यांना कधीही पहिले नव्हते.संत चरित्रावर बोलणारी व्यक्ती म्हणजे कुणीतरी वयस्कर व्यक्ती असेल असा माझा समाज होता.पण २६/२७ वर्षाचा एक तरुण या विषयावर ज्या पद्धतीने बोलत होता ते पाहून मी थक्क झालो.कार्यक्रम संपल्यावर मी आवर्जून त्यांना भेटलो.त्यांचे कौतुन केले. भाषेतील साधेपणा,मार्मिक चिंतन, विनोदबुद्धी,आवाजातील गोडवा आणि सद्द परिस्थितीच निरीक्षण या सगळ्या गोष्टी वाखाणण्याजोग्या होत्या.
त्यानंतर मी त्यांच्या संपर्कात राहिलो.त्यांची अनेक व्याख्याने मला ऐकायला मिळाली.जितक सुरेख ते संतचरित्रावर बोलतात तितकच ते शिवचरित्रावर व ग्रामीण भागातील प्रश्नांवरही बोलतात.अनेक कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये ते सॉफ़्टस्किल डेव्हलपमेंट,या विषयांवर त्यांची व्याख्याने होतात.शाळा,महाविद्यालयापासून तर महाराष्ट्र शासनाच्या 'यशदा' या शिखर संस्थेतील प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत अनेक ठिकाणी गणेश शिंदे यांच्या व्याख्यानांनी श्त्रोत्यांना मंत्रमुग्ध केलेलं मी पाहिलं आहे.
गणेश शिंदे हा महाराष्ट्रातील एक युवा व्याख्याता,एक लेखक,ग्रामीण भागातील तरुणांचं नेतृत्व करणारा एक युवा कार्यकर्ता.त्यांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचावेत म्हणून वेबसाईटच्या माध्यमातून मी हा प्रयत्न करीत आहे.त्यांच्याबरोबर गप्पा मारताना त्यांचा जीवनपट उलगडत गेला. निबंती ता.श्रीगोंदा जि.अहमदनगर या अतिशय छोट्या गावी गणेश शिंदे यांचा जन्म झाला.तिथेच जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले.नंतर शिक्षणाच्या निमित्ताने अहमदनगर जवळील केडगाव या गावी त्यांचे कुटुंब आले.तेथील रयत शिक्षण संस्थेच्या अंबिका विद्यालयात त्यांनी अडमिसन घेतले.त्यांच्या वक्तृत्व कलेला तेथूनच प्रोत्साहन मिळाले.कर्मवीर जयंती,१५ ऑगस्ट,२६ जानेवारी या दिनानिमित्त शाळेत भाषणासाठी गेनेश अग्रेसर असायचा.अवांतर वाचन,विविध शालेय स्पर्धांमधील सहभाग यातून त्यांचा आत्मविश्वास वाढत गेला.११ वी,१२ वी (सायन्स) चे कॉलेज पूर्ण केले.कॉलेज अहमदनगर मधील न्यू आर्ट्स कॉलेजमध्ये पूर्ण केले.पुणे येथील राय फौंडशन येथे पत्रकारितेच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला.नंतर एका वर्तमानपत्रात काम करता करता नगरमधीलच न्यू आर्ट्स कॉलेजमध्ये कला शाखेतून पदवी घेतली.
अहमदनगरच्या जिल्हा परिषदेला श्रीमती प्राजक्ता लवांगरे या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होत्या.त्यांनी गणेश शिंदे यांचे व्याख्यान ऐकले आणि त्याचवेळी संपूर्ण स्वच्छता अभियानाची चळवळ नगरमध्ये जोर धरत होती.गणेश शिंदे या चळवळीत आपोआप ओढले गेले.संपूर्ण स्वच्छता अभियानात गणेश व त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी झोकून दिले.शाळा,महाविद्यालये,गावोगावी फिरून त्यांनी प्रबोधनाचे काम केले.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून न्यू आर्ट्स कॉलेजने एक गाव निर्मल ग्रामसाठी दत्तक घेतले.त्या गावात प्रत्यक्ष काम करण्याची संधी गणेश शिंदे व त्यांच्या मित्रांनी दडविली नाही.त्या गावाला 'निर्मल ग्राम' पुरस्कारही मिळाला.या अभियानाने गणेशच्या वकृत्वाला एक सामाजिक स्थान मिळाले.पुढे गणेश पुण्याला डी.वाय.पाटील कॉलेजमध्ये एम.बी.ए. ला अडमिशन घेतले.सुरुवातीला या शहरी वातावरणात बुजणारा गणेश नंतर महाविद्यालयात अनेक शिक्षकांच्या गळ्यातील ताईत बनला.पुण्यातल्या झगमगातही कॉलेज त्याची आध्यात्मिक बैठक पक्की होती कॉलेजच्या दिवसातच त्याचे 'सुख' हे पहीले ललीत पुस्तक प्रकाशित झाले होते.साध्या सरळ भाषेत मांडलेली सुखाची संकल्पना आणि त्या विचारावरील अध्यात्मिक पकड मजबूत होती.
एम.बी.ए. प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या गणेशने टाटा मोटर्स या नामांकित कंपनीत 'कॉर्पोरेट सोशल रीस्पोन्सिब्लीतीज' या विषयांवर प्रोजेक्ट केला.गणेश कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये रमला नाही.वर्तमानातून पत्रकारिता व्यवस्थापन शास्त्राचा लेक्चरर,जिल्हा परिषद पुणे या ठिकाणी मानव विकास संसाधन व्यक्ती 'यशदा' या शासनाच्या प्रशिक्षण संस्थेत संसाधन व्यक्ती,विविध कंपन्यामध्ये मोटिव्हेशनल लेक्चर अशा अनेक गोष्टीत गणेशने आपली गुणवत्ता नेहमीच सिद्ध केली.
नेहरू युवा केंद्राने आयोजित केलेल्या अनुउर्जा चर्चासत्रात दिल्ली येथे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले.निर्मल ग्राम अभियानात २००७-०८ मध्ये गणेशने केंद्रीय समितीत काम केले.अनेक शासकीय संस्थामधून गणेशने प्रबोधनाचे काम केले.ग्रामसेवक.सरपंच,शिक्षक,पोलिस,शासकीय कर्मचारी यांच्या प्रबोधनासाठी विविध विषयांवर त्याने संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला.त्याच्या कामाची दखल घेत महाराष्ट्रातील विविध संस्थांनी त्यास 'वक्तृत्व भूषण पुरस्कार' , 'लोकसेवा पुरस्कार', 'मराठा भूषण पुरस्कार' 'लोकसेवा पुरस्कार' अशा विविध पुरस्कारांनी सन्मानीत केले.
गावाकडे जाऊन युवकांचे संघटन केले.ग्रामपंचायतच्या निवडणुकीला उभे राहून गणेशने ग्रामपंचायतची निवडणूक जिंकली.ग्रामीण भागातील तरुणांनी अध्यात्माकडे वळावे यासाठी गणेश सदैव प्रयत्नशील आहे. आपल्या वक्तृत्वाने गणेशने अनेकांना प्रभावित केले.त्याने लिहिलेल्या मराठी गाण्याच्या (राणी गं) हा ओडिओ अल्बम प्रसिद्ध झाला आहे.
झी २४ तास या वृत्तवाहिनीवरून चालणाऱ्या 'पासवर्ड आनंदाचा ' या कार्यक्रमातून गणेशाचे विचार आपण ऐकलेच आहेत.प्रभावी वक्तृत्व व सामाजिक जाणीव असणाऱ्या गणेशने मित्रांच्या सहकार्याने प्रबोधनाच्या क्षेत्रात काम करणारी 'निर्मित ग्रामीण विकास प्रतिष्ठान' हि संस्था सुरु केली.अनेक पातळीवर काम करणाऱ्या या युवकाचे विचार तुमच्या पर्यंत पोहोचावेत म्हणून मी हा अट्टाहास करीत आहे.
पंकज फुले
प्रोफेसर, सिंहगड कॉलेज, पुणे